मन आणि ऊर्जा औषधे
३१ वर्षांच्या वैद्यकीय प्रॅक्टीसने मला एक गोष्ट शिकविली की सर्व गोष्टी आपल्या मनाशी, आपल्या उर्जेशी व आपल्या भावनांशी संबंधित आहेत. होमिओपॅथिक सल्लागार आणि वैकल्पिक थेरपिस्ट (अल्टरनेटिव्ह) म्हणून मी पूर्णपणे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जेव्हा आपण आपल्या मनास समजून घेता आणि वागता तेव्हा आपण आपले मन, शरीर आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण करता.
त्याला ‘संपूर्ण आरोग्य’ म्हणतात.
आपली बदललेली जीवनशैली, आपले पालनपोषण, शिक्षण, संस्कार, आहार, झोप, कामाचा ताण, व्यायामाचा अभाव, नाते संबंधामधील असंतुलन इत्यादी कारणांमुळे आपल्या आयुष्यात दिवसेंदिवस ताणतणाव वाढत जाताना दिसत आहेत. सध्या धकाधकीच्या आयुष्यात ताण वाढतच आहे. ताणाचे पहिले कारण भीती, अपयशाची भीती, न्युनगंड, नकाराची भीती. दुसरे कारण प्रत्येक गोष्टीबद्दल अनिश्चितता. तसेच काही गोष्टींमध्ये अती रस किंवा अगदिच अरसिकता. एकटेपणा. अतिसंवेदनशीलता किंवा जास्त भावनिक वर्तन. निराशा किंवा उदासिनता. परंतु समस्या आहेत तसे त्याचे उपायहि आपल्याकडे आहेत. या समस्यांवर कार्य करण्याचे विविध मार्ग आहेत. चुकीची कामे करणे, चुकीची औषधे घेणे किंवा चुकीचे निर्णय घेणे हे उपाय असू शकत नाहीत.
मी आणि माझी पत्नी मागील २५ वर्षांपासून होमिओपॅथी, निसर्गोपचार, संतुलीत आहार, एंजल थेरपी, क्रिस्टल थेरपी, हस्ताक्षर शास्त्र, मंत्र चिकित्सा, मुद्रा, स्पर्श चिकित्सा, स्विच-वर्डस यासारख्या ब-याच पद्धतींवर कार्य करीत आहोत.
अशीच एक अनोखी दैवी चिकित्सा म्हणजे ‘पुष्पौषधी’, ज्याला ‘उर्जा औषधे’ असेही म्हणतात, जे आपल्या मनावर, भावनांवर आणि उर्जेवर कार्य करते. ही औषधे शरीर व मनावर जलद व विलक्षण परिणामकारक अशी आहेत.
आताच्या तणावपुर्ण व धकाधकीच्या काळात स्वतःच्या समस्या स्वत: सोडवण्यासाठी आपल्याला काहीतरी हवे आहे. म्हणूनच हे उपाय काय आहेत, ते कसे कार्य करतात, कोठे व कधी वापरायच्या आणि काय अपेक्षित आहे यावर आम्ही कार्यशाळा घेणार आहोत. अनेक कार्यशाळा, बरीच पुस्तके आणि २५ वर्षांच्या अनुभवामुळे, डॉ. बाख यांनी शोधून काढलेल्या या अनोख्या ‘पुष्पौषधी’ समजून घेण्यासाठी ही अनोखी कार्यशाळा आम्ही घेत आहोत. डॉ. बाख यांनी या ३८ औषधांचा शोध लावला कारण त्यांचे एकमेव उद्दीष्ट हे होते की ‘सामान्य व्यक्तीनेही आपली मानसिक स्थिती किंवा स्वभावानुसार स्वतःची औषधे ठरवून आपल्या आजारापासून मुक्त व्हावे आणि या उपायाचा कोणताही दुष्परिणाम होऊ नये.’
“स्वत: स्वत:ला बरे करा” हे त्यांचे ब्रिद वाक्य होते.
कृपया आमच्याशी मोकळ्या मनाने चर्चा जरुर करा.
संपर्क : डॉ. आदित्य व डॉ. अदिती तेंडले : ९८२०२३९७१८ / ७६६६९०७९७०
No Comments