लाईफ मंत्र ( आरोग्यदायी कार्यक्रम )
नमस्कार मित्रांनो, आज मी आमच्या आरोग्यदायी जीवन देणा-या “लाइफ मंत्र” या विषयावर चर्चा करणार आहे. नावाप्रमाणेच हा कार्यक्रम निरोगी जीवन कसे जगायचे याबद्दल आहे. सोशल मीडियावर बरीच माहिती उपलब्ध असल्याने आजकाल सर्वसामान्यपणे प्रत्येकाला स्वस्थ कसे राहायचे हे माहित आहे. पण मग हा कार्यक्रम अनोखा का आहे? हा कार्यक्रम अनोखा आहे कारण आम्ही गेले 25 वर्षांपासून यावर कार्य करीत आहोत जे आपल्या पारंपारिक तंत्रांवर आधारित आहे, दररोजचे काम म्हणून करीत रहायचे आणि हळूहळू ही आपली सवय बनते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे, त्याचे वैशिष्ट्य आणखी एक आहे की आपण शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या कायम स्वस्थ राहण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकास हे ऑनलाइन देत आहोत.
मग हा अनोखा आरोग्य कार्यक्रम काय आहे ?
कार्यक्रमाबद्दल सांगण्यापूर्वी आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ. शारीरिक, मानसिक भावनात्मक आरोग्य. संपुर्ण आरोग्य म्हणजे मनाचे शरीर आणि आत्म्याचे संतुलन. आजकाल आपण अगदी सर्दी खोकल्यापासुन कर्करोगही सर्वत्र पाहतोय. जर मी विचारले की, कोणी असे आहे की ज्याने मागील सहा महिन्यांत कोणतेही औषध घेतले नाहीय, तर ९०% लोक म्हणतील की नाही, परंतु मी २५ वर्षांपूर्वी असा प्रश्न विचारत असे तेव्हा ९०% लोक हात वर करुन हो म्हणायचे आपण कोणतेही औषध घेतले नाही. आता रक्तदाब, मधुमेह, हृदयाच्या समस्या आणि लठ्ठपणा खूप सामान्य आहे जे पूर्वी नव्हते. याचे कारण म्हणजे आपल्या जीवनशैलीतील बदल, आपल्या बदललेल्या सवयी. हे रोग नाहीत ते आपल्या बदललेल्या जीवनशैलीचे दुष्परीणाम व विकार आहेत. रोग संसर्गामुळे होतात; विकार चुकिच्या जीवनशैलीमुळे होतात.
संपूर्ण आरोग्यासाठी आणि सामान्य व्यक्तिचे रूपांतर कौशल्यपुर्ण व्यक्तीमध्ये व्हावे यासाठी लोकांना मदत करण्याच्या उदृश्यासह आम्ही रिच अथ सोल्युशन्स या संस्थेची सुरुवात केली. आम्ही काय करतो हे सांगण्याआधी आपण स्वस्थ व निरोगी का नाही याची कारणे शोधणे आवश्यक आहे. पूर्वी आपण मोठ्या एकत्रित कुटुंबात रहायचो जिथे बहुतेक वयस्कर लोक आणि स्त्रिया घर आणि मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण, मूल्ये आणि सर्वांचे पालनपोषण याकडे लक्ष देत. पण आता छोटी कुटुंबे आहेत जिथे नवरा, बायको आणि एक किंवा दोन मुलं असतात. प्रत्येकाची स्वतःची उद्दीष्टे, मूल्ये, तत्त्वे आणि मानसिकता असतात. एकमेकांकडून अपेक्षा वाढल्या आहेत पण संवाद कमी झाला आहे ज्यामुळे तणाव निर्माण होतो, आणि सर्व समस्यांचे मुख्य कारण म्हणजे तणाव. म्हणून, जर आपल्याला आरोग्य हवे असेल तर आपण पूर्वजांच्या जीवनशैलीचे पालन केले पाहिजे. जर आपण त्यांच्या परंपरा, आध्यात्मिक कृत्ये आणि सवयी पाळण्यास सुरवात केली तर आपण सहजपणे संपूर्ण आरोग्य प्राप्त करू.
प्रथम कोणत्या गोष्टी बदलल्या आहेत ते शोधूया
सध्या प्रत्येक क्षेत्रात दररोज ताणतणाव वाढत असल्याचे आपण पाहतो आहोत . लहान मुलांनाही ताण येतो आणि यामुळे सगळ्या समस्या उद्भवतात. याचे पहिले कारण म्हणजे एकमेकामधील संवाद कमी झालाय. दुसरे कारण म्हणजे जेवणाच्या सवयी बदलल्या आहेत आणि तिसरे म्हणजे बसून काम केले जाते आणि अंगमेहनत व व्यायाम कमी झालाय. या तीन गोष्टींचा शेवट मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि लठ्ठपणा यामध्ये होतो.
या ताणामुळे अगदी सर्दी खोकल्यापासून कर्करोगापर्यंत आजार होऊ शकतात . चिंता, एकाग्रता समस्या, स्मरणशक्ती, नकारात्मकता इत्यादी मानसिक आजार होऊ शकतात. भावनात्मक पातळीवर राग, नैराश्य, निर्विकारपणा, आत्मविश्वास गमावणे हे होऊ शकते. व्यसन, निद्रानाश, अस्वस्थता इत्यादी त्रास उदभवू शकतात.
लाईफ मंत्रामध्ये आम्ही यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन करतो.
प्रथम खाण्याच्या सवयींवर लक्ष केंद्रित करा. योग्य संतुलित आहार घेणे सुरू करा आणि विशेषत: योग्य वेळी खा. तुमचा नाश्ता राजासारखा, दुपारचे जेवण सामान्य माणसासारखे आणि रात्रीचे जेवण गरीब माणसासारखे असले पाहिजे. पण आपण याच्या अगदी उलट करतो. आपल्या आहारात 50% कोशिंबीरी व न शिजवलेले अन्न, २५% प्रथिने आणि २५% पिष्ट्मय पदार्थ असणे आवश्यक आहे.
मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट असण्यासाठी नियमित व्यायाम करणे अनिवार्य आहे. ऊर्जा, उत्साह आणि आनंदासाठी व्यायाम महत्वाचा आहे.
झोपेच्या व्यवस्थापनाची काळजी घेतली पाहिजे. दररोज रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ७ ते ८ तासांची निवांत झोप मिळणे आवश्यक आहे-
मानसिक स्वास्थ्यासाठी – सकारात्मक दृष्टीकोन, आनंद, कुटुंबासाठी वेळ देणे .
मानसिक आणि भावनिक ताकदीसाठी आपण आपल्या उर्जा पातळीवर कार्य करणे आवश्यक आहे.
असे बरेच उपचार आहेत जे आपल्या उर्जा पातळीवर, ताण कमी करण्यासाठी आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी कार्य करतात.
ध्यान आणि संमोहन शास्त्र, श्वासोच्छ्वास व्यायाम, प्राणायाम, योगशास्त्र, मुद्रा शास्त्र, हस्ताक्षर शास्त्र, क्रिस्टल थेरपी, विविध आभा आणि चक्र हिलिंग करण्याची तंत्रे, होमिओपॅथी आणि पुष्पौषधीसारख्या उर्जा औषधे, संपूर्ण आरोग्य मिळविण्यात मदत करतात.
आम्ही या अद्वितीय आरोग्य कार्यक्रम लाईफ मंत्रामध्ये गेल्या २५ वर्षांपासून एकाच छताखाली हे सर्व उपाय देत आहोत. हजारो लोक या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत, निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत. आता काळाबरोबर या महिन्यांत आम्ही या क्षेत्रात प्रगत सुविधा सुरु करीत आहोत. आम्ही आपल्याला या सर्व सुविधा कधीही कुठेही वापरता याव्या म्हणून ऑनलाइन उपलब्ध करुन देत आहोत. फक्त आपल्याला या लाईफ मंत्र समुहामध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे. आम्ही या समुहामध्ये विविध आरोग्य टिप्स, तंत्रे, उपाय, औषधे, आहार, ध्यान देणार आहोत. दर आठवड्याला तुमच्यासाठी नवीन गोष्टी येतील ज्यांचे तुम्ही घरी सहजपणे अनुसरण करु शकाल आणि तुमच्या आरोग्याची लक्ष्ये साध्य कराल.
तर मंडळी संपुर्ण आरोग्य प्रवासात सामील होण्यासाठी तयार व्हा.
तपशीलांसाठी संपर्क साधा
डॉ आदित्य- ९८२०२३९७१८ डॉ अदिती- ८४२४०२३०३१
No Comments