दिनचर्या विश्रांतीकाळातील
नमस्कार मित्रांनो
आरोग्य, मन:स्वास्थ्य, जिवनशैलीचे व्यवस्थापन, ध्येय, वेळेचे व्यवस्थापन, ताण-तणावावरचे नियंत्रण या व यासारख्या विषयांवर खुपदा बोललोय, आजही काही वेगळे नाहिय आरोग्य, मन, वेळ व ताणाचे नियंत्रण आणि सद्यपरीस्थीतीत यावर खुप विचारल जातय, म्हणून हा प्रयत्न.
या सक्तीच्या विश्रांतीकाळात काय करु नये यावर खुप चर्चा होतेय, म्हणून काय कराव, जीवनशैली कशी संतुलीत ठेवावी यावर काही बोलू. माझा अनुभव, मला असलेली माहीती, जी कदाचित तुमच्याकडेही आहे, ती वापरावी कशी हे पाहू. एक दिनक्रम बनवू, दिनचर्या ठरवू.
वेळ कसा घालवावा ज्यांना सुचत नसेल त्यांना उपयुक्त असेलच परंतु वेळ फुकट जातोय असे वाटत असेल त्यांना हे खुपच उपयुक्त ठरेल. वाचा, पटलं तर वापरा व आवडल तर इतरांना सांगा. याकाळात पुर्वीच्या चांगल्या सवयी कायम ठेवणे आवश्यक आहे नाहीतर ही विश्रांती संपल्यावर कामाचा बोजा जास्त वाढल्यावर त्याचा त्रास होऊ शकेल. जे काही करायच ते ताण न घेता करायच, मनात काही किंतु परंतू न ठेवता करायच, पुर्ण विश्वास ठेवून करायच. चला तर सुरु करु.
दिनचर्या लिहून काढा.
- सकाळी लवकर उठणे फार महत्वाचे आहे, जरी काम नसेल तरीही लवकर उठण्याची सवय सुरु ठेवा. त्यासाठी रात्री लवकर झोपा, सामान्यत: ५ वाजता उठणे योग्य आपल्या समविचारी लोकांचा ग्रुप बनवा.
- पहिले ३ दिवस उठल्याबरोबर ब्रश करण्यापुर्वी ४ गोळ्या आर्सेनीक अल्ब 30 हे होमिओपथिक औषध घ्या. काही वेळाने ब्रश करून चहा नाश्ता करा.
- मधल्या वेळात काही श्वासाचे प्रकार व तुमचा नियमित व्यायाम करा. नियमित श्वासाचे प्रकार व व्यायाम करत नसाल तर शिका. दिर्घ श्वसन, प्राणायाम, उज्जायी, भस्त्रिका तसेच ओम हे सर्व प्रकार खुप सोपे आहेत आणि सद्यस्थितीत खुप उपयुक्त आहेत. सकाळच्या वेळी जास्तित जास्त प्राणवायू उपलब्ध करुन देण्यासाठी हे श्वासाचे प्रकार मदत करतील. या क्रिया नाक व घश्याचे कार्य व्यवस्थित होण्यास मदत करतात. या क्रिया करताना हवा नाक व घश्यातुन घर्षण करत आत जाते व बाहेर येते, त्यामुळे संसर्ग रोकते व असेल तर नष्ट करते. याबरोबर तुम्ही शारीरीक व्यायाम करणे गरजेचे आहे. येत नसतील तर कमीतकमी सुर्यनमस्कार घालावेत. शारीरीक व्यायाम केल्यावर शरीरात एंडॉर्फिन हे संप्रेरक (हॅपी हार्मोन) स्त्रवते जे ताण कमी करुन उत्साह वाढवते.
- या नंतर आहार येतो. वेळच्यावेळी योग्य संतुलीत आहार घेणे आवश्यक आहे. अशी म्हण आहे नाश्ता राजासारखा करावा, दुपारचे जेवण सामान्य माणसासारखे व रात्रीचे जेवण भिका-यासारखे करावे आपणे नेमके उलट करतो. नाश्ता करतच नाही आणि रात्री जड व अतिसेवन करतो त्याचे शरीरावर वाईट परीणाम होतात. आपण काय खातोय व कोणत्या वेळी खतोय याचा विचार करणे आवश्यक आहे. विज्ञान सांगते रात्रभर शरीर दुरुस्तीचे काम करत असते त्यामुळे सकाळी शरीराला जास्त पोषण हवे असते तेव्हा आपण देत नाही आणि रात्री जास्त व जड जेवण घेतले तर शरीर दुरुस्ती सोडून जेवण पचवण्याचे काम करत राहते त्यामुळे सकाळी ताजेतवाने वाटत नाही. नाश्ता उठल्यानंतर एक ते दिड तासात, दुपारचे जेवण १२.३० पर्यंत रात्रीचे जेवण ८.३० पर्यंत होणे आवश्यक आहे. मधल्या वेळात काही पोषक खावे. रात्रीचे जेवण व झोप यामध्ये २ तासांचे अंतर असावे. आताच्या परीस्थितीत जेवणात जास्तित जास्त जीवनसत्वे, पोषक द्र्व्ये असावीत. लिंबू, आले, फळे, पालेभाज्या, कडधान्ये, कोशींबीरी यांचे प्रमाण जास्त असावे. दिवसाला ३/४ लिटर पाणी, गरम पाणी प्या. सकाळी गरम पाण्यात हळद घालून प्या. गुळण्या करा, वाफ़ घ्या. दुध या विषयावर खुप चर्चा होऊ शकते पण आता पुरते इतकेच की गाईचे दुध प्या. प्रथिने, कॅल्शियम यांची काळजी घ्या. आवश्यक तिथे पुरक-अन्न घ्या.
- शरीराचा निचरा होणे आवश्यक असतो. शरीरात हवा, पाणी व अन्ना बरोबर पोषक द्रव्ये जातात तशी विषारी द्रव्येही (टॉक्सीन्स) तयार होतात. त्यांचा निचरा होणेही आवश्यक असते. त्यासाठी काही तंत्रे असतात ती शिका व वापरा.
- झोप ७ ते ८ तासांची शांत झोप तुमच्या शरीराला आवश्यक आहे.
- काही औषधे ज्यांना उर्जा औषधेही म्हटले जाते. पुष्पौषधी हि होमिओपथीची एक शाखा आहे. या घडीला यातील काही औषधांचे मिश्रण ४-४-४ घ्यावे. मन:शक्ती वाढवण्यास उपयुक्त. या औषधांची माहिती घ्या व ती वापरा ज्यांचे शरीरावर काही विपरीत परीणाम होत नाहित.
- मानसिक आरोग्यासाठी वाचन, लिखाण, काही व्याख्याने, शिबिरे, आध्यात्मिक गोष्टी (जप,श्लोक,मंत्र इ.), ध्यान धारणा, सकारात्मकता देणारी प्रत्येक गोष्ट करा. येत नसतील तर शिका.
कितीतरी गोष्टी आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. रिकामी वेळाचा फायदा घ्या. नविन गोष्टी शिका, नविन तंत्रे शिका, कला- कौशल्ये शिका. हा विश्रांतीकाळ संपल्यावर मनाने कणखर लोकांची समाजाला गरज असणार आहे. तेव्हा या वेळेचा सदुपयोग करुया. वाईट भुतकाळ विसरुन, वर्तमानात जगून भविष्यकाळासाठी तयार होऊया.
मित्रांनो वरील सगळ्या गोष्टींतून एक गोष्ट लक्षात आली का. आपल्याला आपली शारीरीक व मानसिक प्रतिकार शक्ती वाढवायची आहे. तुमच्या हत्यारांना धार काढून ठेवायची आहे.
इतर सूचना तुम्ही पाळत आहातच. आपण सुज्ञ आहात.
No Comments